सध्याच्या काळात आपण प्रत्येक क्षणाला फोटो किंवा व्हिडीओ काढत असतो. जवळपास सर्वच मोबाइल कंपन्यांनी आपले इंटर्नल स्टोरेज वाढवून दिले आहे. मात्र १२८ जीबी स्टोरेज असूनही आपल्याला ते पूरत नाही. आणि Low Mobile Storage होते. त्यामुळे बर्याच वेळा आपल्याला अनेक फोटो किंवा व्हिडीओ इच्छा नसताना डिलीट करून टाकावे लागतात.
Google Drive इथून डाउनलोड करा
Low Mobile Storage वरती उपाय काय –
आपल्या मोबाईल मध्ये गूगल ड्राईव्ह हे एप्लिकेशन आधीच इन्स्टाॅंल असते. पण जर नसेल तर प्ले-स्टोर मध्ये जाऊन Drive असं सर्च करून हे एप्लिकेशन डाउनलोड करा आणि इन्स्टाॅंल करा.
त्यामध्ये तुमच्या गूगल ईमेल आयडी ने लॉगिन करा. इथे तुम्ही तुमचे फोटोज, व्हिडिओ आणि ईतर फाईल्स अपलोड करा.
मोबाईल डेटा वरून फाईल्स अपलोड होत नसतील तर –
Drive या एप्लिकेशनच्या सेटींग मध्ये जा, त्यानंतर सर्वात खालचा पर्याय Files Transfer only over Wi-Fi हा पर्याय बंद करा.
किती स्टोरेज फ्री –
आपल्याला एका ईमेल आयडी वरती १५ जीबी पर्यंत फ्री मिळते. त्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर आपण विकत घेऊ शकतो.
सेफ आहे का ?
आपण अपलोड केलेल्या गूगल क्लाऊड ला सेव्ह होतात. आपल्या शिवाय ते कोण पाहू शकत नाही. जोपर्यंत आपण स्वतः त्यांना एक्सेस देत नाही.