Site icon गावची खबर

Dhruv Rathee चा youtube channel होऊ शकतो Ban….

Dhruv Rathee

भारतीय नागरिक असणारा आणि सध्या जर्मनीत वास्तव्यास असलेल्या Dhruv Rathee हा YouTuber सध्या खूप चर्चेत आहे.
त्याने आपल्या YouTube channel वरून ” डरा हुआ डिक्टेटर ” असं Title असणारा Video Upload केला आहे.

व्हिडिओ मध्ये कोणते मुद्दे मांडले आहेत :

  1. अरविंद केजरीवाल यांची अटक.
  2. ३ मधील २ इलेक्शन कमिशनर्सना मोदींनी स्वतः नियुक्त केले आहे.
  3. असंवैधानिक इलेक्टोरल बॉण्ड्स.
  4. काँग्रेसचे बँक अकाउंट फ्रिज केले आहेत.
  5. जुन्या केसेस मध्ये काँग्रेसला १७०० कोटींची आयटी नोटीस
  6. कम्युनिस्ट पार्टीला ११ कोटींची आयटी दंड

कोण आहे Dhruv Rathee : Dhruv Rathee चा जन्म 8 ऑक्टोबर 1994 रोजी हरियाणा, भारत येथे झाला. उच्च शिक्षण घेण्यापूर्वी त्यांनी हरियाणामध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. राठी यांनी प्रतिष्ठित जर्मन विद्यापीठ, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक (TUM) मधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असताना त्यांची सामाजिक आणि राजकीय समस्यांबद्दलची आवड वाढली आणि त्यांनी विविध विषयांवर चर्चा आणि वादविवादांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर, राठीने YouTuber आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.

Dhruv Rathee ने आवाहन कोणते केले आहे :

1. आपला आवाज उठवा.

2. मतदान करा.

3. आपल्या आसपासच्या लोकांना मतदान करायला सांगा.

4. हे सर्व करायचं आहे आनंदाने कोणाला कसलाही त्रास न देता.

कसा होईल Youtube channel Ban :

Broadcasting services regulation bill 2023 च्या अनुसार ज्यांचा कोणाचा  Youtube channel आहे, Whatsapp channel आहे, facebook account व instagram handle आहे. हे सर्व broadcasters category मध्ये येतील.  आणि ह्या सर्वाना सरकार कडे रजिस्टर करावे लागेल. व Central evaluation committee च्या परवानगी शिवाय काहीही उपलोड करता येणार नाही. आणि सरकार कोणत्याही नोटिसीशिवाय यांचे सर्व Equipments seize करू शकते.

इथे क्लिक करून पहा पूर्ण व्हिडिओ

Exit mobile version