Site icon गावची खबर

२०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार – प्रशांत किशोर

प्रशांत किशोर

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे भाकीत केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर लोक नाराज आहेत मात्र त्यांना सोडून दुसरा पर्याय नसल्याचे त्यांना पटवून देण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे. तसेच २०१९ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे जास्त खासदार निवडून येतील हे सुद्धा त्यांनी सांगितले.

कोण आहेत प्रशांत किशोर – प्रशांत किशोर हे राजनैतिक विश्लेषक आहेत. संयुक्त राष्ट्र संघात त्यांनी सार्वजनिक आरोग्य प्रकल्पांमध्ये काम केले आहे.

२०१४ मध्ये भाजपाला पूर्ण बहुमताने सत्तेत बसवण्यात मदत केली होती. तसेच २०१५ मध्ये नितिशकुमार २०१७ मध्ये कॉंग्रेसला पंजाबमध्ये तर पश्चिम बंगाल मध्ये २०२१ ला अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस व तामिळनाडू मध्ये डीएमकेला राजनितीकार म्हणून मदत केली.

२०२४ लोकसभेचा निकाल ४ जून २०२४ ला‌‌ असणार आहे

Exit mobile version