१ जून २०२३ रोजी प्रज्वल रेवन्ना यांनी बॅंगलोरच्या कोर्टामध्ये ८६ मिडिया आउटलेटस् आणि ३ लोकांवरती एडीट केलेले फोटोस आणि व्हिडिओज प्रसारीत करण्याचा आरोप ठेवून केस केलेली होती.
कोण आहेत प्रज्वल रेवन्ना :
JDS चे खासदार व पूर्व प्रधानमंत्री एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांनी २९७६ सेक्स व्हिडिओज बनवले होते. त्यामध्ये बलात्कार, ब्लॅकमेल सोबतच कटकारस्थान रचण्याचा आरोप सुध्दा त्यांच्यावर केला जात आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का आहेत गप्प :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः प्रज्वल रेवन्ना यांचा प्रचार केला होता. यावरून सर्व विरोधी पक्षांनी मोदी यांना घेरले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना याबद्दल सर्व माहिती असल्याचा दावा होत आहे. कॉंग्रेसने मोदींवर हल्ला करत याबद्दल त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. व अजून काहीच कारवाई का केली जात नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोणी केले व्हिडिओज लीक :
प्रज्वल रेवन्ना यांच्या ड्रायव्हर ने हे सर्व व्हिडिओज लीक केले होते. जेव्हा प्रज्वल रेवन्ना यांनी बॅंगलोरच्या कोर्टामध्ये केस केलेली होती त्यामध्ये ड्रायव्हरचे सुध्दा नाव होते. ते सात वर्षांपासून प्रज्वल रेवन्ना यांच्यासोबत काम करत होते.
आरोप-प्रत्यारोप :
केस दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रज्वल रेवन्ना यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. असं रेवन्ना याचं म्हणणं आहे. तर ड्रायव्हर मी स्वतःहून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती असं बोलत आहेत. रेवन्ना यांनी आपल्याला व पत्नीचं अपहरण केले होते.
गुगल वरती आणि सोशल मीडियावरती हे व्हिडिओज खूप सर्च केले जात आहेत.
संपूर्ण देशात या बातमीचा खुलासा झाला असताना प्रज्वल रेवन्ना हे जर्मनीला पळाले आहेत. तसेच त्यांचा म्हणनं आहे हे सर्व AI टेक्नॉलॉजीचा वापर करून मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटक पोलीस याबद्दल अजून तपास करत आहे.