Site icon गावची खबर

२०२४ मध्ये Learn English Smart पध्दतीने…

The Smart Way to Learn English in 2024

२०२४ मध्ये Learn English शिका Smart पध्दतीने…

English ही अशी भाषा आहे जी Global Language म्हणून ओळखली जाते. सध्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहायचं असेल तर English
फक्त वाचायला येणे पुरेसे नाही. आपल्याला बोलता सुध्दा आली पाहिजे.
आणि त्यासाठी खालील गोष्टी गरजेच्या आहेत.

१. English बोलण्याचा रोज सराव करणं.
२. English लिहिण्याचा रोज सराव करणं.
३. English Stories ऐकणं.
४. नवीन English शब्द शिकणे आणि त्यांचा अर्थ पाहून बोलण्यात वापर करणे.

१. English बोलण्याचा रोज सराव करणं. – आपल्या सोबत कोणीही बोलायला नसते म्हणून आपण सराव करत नाही. यावर उपाय म्हणून Ace Fluency नावाचं Application मोबाईल मध्ये Download करा.
त्यात तुम्ही रोज २० मिनिटे एका अनोळखी व्यक्तीशी English मध्ये बोलू शकता. घाबरायचे कारण नाही. समोरील व्यक्ती सुध्दा आपल्यासारखा सराव करत असतो. न चुकता रोज हा सराव चालू ठेवा.
या App मध्ये Group Chat सुध्दा आहे ते सुद्धा वापरून पहा.

२. English लिहिण्याचा रोज सराव करणं. – कोणत्याही Field मध्ये काम करताना आपल्याला Formally Email तर लिहावा लागतोच. जसं की नोकरी साठी Apply करताना, रजा मागताना, किंवा नोकरी सोडताना. अशा वेगवेगळ्या प्रसंगांना अनुसरून Email लिहायचा सराव करा. तुम्हाला रूची असेल तर गोष्टी, नातेवाईकांना, मित्रमंडळींना E-mail करून संपर्क करा.

३. English Stories ऐकणं. – आपण आपली मराठी ऐकून ऐकून शिकलो आहोत. आणि आता English शिकताना सुध्दा हेच करायचं आहे.
YouTube असेल किंवा Kuku FM, Amazon audible असेल यांना तुमच्या आयुष्यात स्थान द्या. नियमाने कमीतकमी ३० मिनिटे English शब्द कानावर पडू द्या.

४. नवीन English शब्द शिकणे आणि त्यांचा अर्थ पाहून बोलण्यात वापर करणे. – जिथं कुठे English शब्द नडेल लगेचच त्या क्षणी त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग कसा आहे हे पाहून घ्या.

आपल्याकडे असणारा Smartphone या सर्व गोष्टी साठी पुरेसा आहे. त्याचा पूरेपूर वापर करून घेता आला पाहिजे. तुम्ही जर इथपर्यंत आला आहात तर तुमच्यासाठी काही Pro Tips – १. आरशासमोर उभे राहून दररोज एक English मधील एक पान मोठ्याने वाचा. अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा.

२. मोबाईलचा Selfie Camera Open करून ते वाचलेलं पानं किती लक्षात आहे हे बघा. Pronunciation बरोबर आहे का बघा.
३. Body language वरती काम करायला, स्वस्तातले Mobile Tripod घ्या. म्हणजे पूर्ण शरीर Record होइल.

चला Happy Learning.

Exit mobile version