तुळस हे हिंदु धर्मात पवित्र असे रोप मानले जाते . तुळशीची पुजा ही केली जाते. सणासुदिला तुळशीला फार महत्त्व दिले जाते. हिंदु धर्मातील लोकांच्या प्रत्येकाच्या घरात ,अंगणात तुळशीचे रोप असतेच. तुळशीचे रोप असणे हे फार पवित्र मानले जाते. अंगणात तुळस असल्याने एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
मात्र तुळशी चे फायदे सर्व सांगतील, पण हे तोटे तुम्हाला माहित आहेत का ?
जुलाब लागणे :
तुळशीच्या पानांचे अधिक सेवन केल्यास गर्भवती महिलांना जुलाब होऊ शकतात. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते.
दात होतील खराब :
तुळशी मध्ये आयर्न आणि पार्याचे प्रमाण असते. त्यामुळे पाने चावून खाल्ल्यास दात खराब होऊ शकतात. किंवा दात आणि हिरड्या दुखू लागतात.
पोटामध्ये आग पडणे :
तुळशीच्या पानांमध्ये गरमी जास्त असते म्हणून अधिक सेवन केल्यास पोटामध्ये आग पडते.
फायदे :
तुळशीची पाने ही आरोग्यासाठी ही उत्तम व अत्यंत गुणकारी आहे .तसेच वेगवेगळ्या आजारांपासून आपणास दुर ठेवते व आपले संरक्षण करते. खोकल्या साठी तुळशीची पान हे अत्यंत गुणकारी आहे.बरेचसे लोक निरोगी राहण्यासाठी दररोज तुळशीच्या पानांचे सेवन करतात. तुळशीच्या पानांतील Anti – Oxidant & Antibiotic गुणधर्म शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.तुळशीच्या पानांचा वापर आरोग्यासाठी तसेच वेगवेगळी औषधी बनवण्यासाठी केला जातो. खूप ठिकाणी सौंदर्य प्रसाधना मध्ये ही तुळशीचा वापर केला जातो.तसेच नवीन ट्रेंड नुसार वेगवेगळ्या प्रकारच्या Herbal Tea, Powder, Healthy Drinks बनवण्यासाठी केला जातो.