Site icon गावची खबर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चापडगाव मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त दिनांक १३ एप्रिल रोजी शनिवारी, चापडगाव मधील सर्व प्राथमिक शाळेंमध्ये परीक्षा पॅड व वहीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी जिल्हा प्राथमिक शाळेमधील नेटके जानवी मॅडम, नळेगावकर अंजू मॅडम, तसेच पवार स्मिता मॅडम आणि तरसदरा शाळेत नेटके प्रकाश सर, धनवडे मंगल मॅडम यांनी मार्गदर्शन केले.  Babasaheb Ambedkar's 133rd birth anniversary in Chapdgaon

बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यावेळी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांबद्दल माहिती दिली. तसेच शिंदे वस्ती शाळेवर विशेष कार्यक्रम घेतल्याबद्दल हनुमंत घनवट सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. व फरताडे सारीका मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर भंडारे वस्ती वरील शाळेत पाचारणे सरांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

शालेय साहित्य मिळाल्यानंतर आणि बाबासाहेबांबद्दल विचार ऐकून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. चापडगावचे जावई अविनाश चक्रे यांनी आपल्या वैयक्तिक खर्चातुन वही वाटप केले. तर चापडगावमधील काही तरुणांच्या सौजन्याने महापुरुषांचे विचार घराघरांत पोहचवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. हे तिसरे वर्ष आहे.

या कार्यक्रमासाठी दादासाहेब सोनवणे, अवीनाश सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, राहुल सोनवणे, सचिन सोनवणे, दत्ता सोनवणे, नामदेव सोनवणे, मनोज सोनवणे, अभिजीत सोनवणे, अविनाश सोनवणे, प्रशांत सोनवणे, सुमित सोनवणे, प्रवीण पोळ, किरण सोनवणे, रोहित सोनवणे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन सोनवणे यांनी सर्व शिक्षकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Exit mobile version