Site icon गावची खबर

उन्हाळा आलाय : आरोग्याची काळजी कशी घ्याल ?

summer season health tips

उन्हाळा आणि त्याची तीव्रता :

ग्लोबल वार्मिंग मुळे पृथ्वी दिवसेंदिवस उष्ण होत चालली आहे. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा कसा असेल ? आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुर्योदय लवकर आणि सुर्यास्त उशिरा होतो. तसेच वातावरणामध्ये तापमान जास्त असते. आणि याधीच फेब्रुवारी हा महिना आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे. यावरूनच येणारे मार्च,‌ एप्रिल, आणि मे हे महिने किती उष्ण असतील. याची कल्पनाच करायला नको. आपण स्वतःची अन् आपल्या प्रिय जणांची काळ्जी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात.

 

उन्हाळा आहे, भरपूर पाणी प्या :

डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या, खासकरून जर तुम्ही घराबाहेर उन्हात वेळ घालवत असाल. कामात असताना आपल्याला पाणी प्यायची आठवण राहत नाही‌. तसेच ऑफिस मध्ये एअर कंडिशनिंग असल्याने आपल्याला घाम येत नाही. अन् गळाशी कोरडा पडत नाही. त्यामुळे बराच वेळा आपलं पाणी पिणं राहून जातं. त्यामुळे लक्ष करून
दररोज किमान 8-10 ग्लास पाणी पिण्यावर लक्ष्य ठेवा.

 

तुमच्या त्वचेचे रक्षण करा :

तुमच्या त्वचेला हानिकारक  सूर्य किरणांपासून वाचवण्यासाठी उच्च SPF असलेले सनस्क्रीन वापरा. दर दोन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा, जास्त घाम येत असेल तर, घराबाहेर वेळ घालवताना संरक्षणात्मक कपडे, सनग्लासेस आणि टोपी घाला.

 

ताजी फळे आणि भाज्या खा: 

टरबूज, बेरी, टोमॅटो, काकडी , आंबा इत्यादी फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांसारख्या हंगामी उत्पादनांचा अधिक प्रमाणावर फायदा घ्या. हे पदार्थ हायड्रेटिंग, जीवनसत्त्वे आणि खनिजे  याने  भरपूर प्रमाणात समृद्ध आहेत. जे संपूर्ण आरोग्यास समर्थन देतात. वेगवेगळ्या फळांचा रस प्या.

 

उन्हाळा आहे, थंड वातावरणात राहा :  

दिवसाच्या सर्वात उष्ण भागांमध्ये (सामान्यतः सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान) घरात राहून तीव्र उष्णतेचा दीर्घकाळ संपर्क टाळा. थंड राहण्यासाठी पंखे किंवा वातानुकूलन वापरा आणि तुमच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करा. शक्य नसल्यास दिवसातून किमान दोन वेळा थंड पाण्याने हात-पाय धुवा.

 

आपल्या डोळ्यांचे रक्षण करा  :

सनग्लासेस :

चेहऱ्याला जास्त घट्ट न बसता व्यवस्थित बसणारे सनग्लासेस निवडा, अतिनील किरण शोषून घेणारे सनग्लासेस डोळ्यांना सर्वाधिक संरक्षण देतात. स्वच्छ सनग्लासेस वापरा.

 

टोपी :

रुंद-कांड्याची टोपी वापरा. त्यामुळे चष्म्याच्या वरून किंवा आजूबाजूला डोळ्यांना आदळणाऱ्या अतिनील किरणांना देखील रोखू शकते. तुमच्या डोळ्यांना सावली देणारी आणि चकाकी कमी करणारी रुंद, गडद काठी असलेली टोपी निवडा.

 

उन्हाळ्याच्या दिवसात कपडे कोणते व कशा प्रकारचे घालावेत :

उन्हाळ्यात, तुम्हाला थंड आणि सूर्यापासून संरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी हलके, श्वास घेण्यायोग्य आणि आरामदायी कपडे घालणे महत्त्वाचे आहे. प्राकृतिक कपड़े ,ढीले-ढाले कपड़े , हल्के रंग  ,सूर्यापासून संरक्षण करणारे कपडे घालावेत. काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करण्यावर भर द्या.

 

बाहेर पडणं टाळा :

उन्हाळ्यामध्ये रखरखत्या उन्हात शक्य असेल तितके बाहेर जाणं टाळा. बाहेर पडताना आपलं पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करा आणि सोबत एक पाण्याची बाटली ठेवा. उन्हातुन आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका. आधी डोक्यावर हलकसं पाणी घेऊन आणि हात पाय स्वच्छ धुवून नंतरचं खाली बसून हळूहळू पाणी प्या.

स्मार्ट व्यायाम करा :

सकाळी चालण्याची सवय लावा. तसेच कोवळे ऊन शरीराला लागू द्या. घरापासून दूर जिम मध्ये जाऊन व्यायाम करत असाल तर सकाळी लवकर निघून आणि व्यायाम आटपून, ऊन जास्त वाढायच्या आत घरी या. जर तुम्ही घराबाहेर व्यायाम करत असाल तर, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करा. हलके, श्वास घेण्यासारखे कपडे घाला आणि व्यायामापूर्वी, दरम्यान आणि नंतर थोडे-थोडे पाणी पीत रहा.

आजार :

आपली पचनसंस्था आणि किडनीला व्यवस्थित कार्य करण्यासाठी मुबलक पाण्याची गरज असते‌. अन् जर ती पूर्ण झाली नाही तर मुतखडा आणि मुळव्याध यासारखे आजार उद्भवू शकतात. तसेच तीव्र उनामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते.

Exit mobile version