Site icon गावची खबर

कसं Bollywood मराठी भाषा संपवत आहे ?

How Bollywood destroying Marathi language ?

Bollywood ची सुरुवात कशी झाली ? –

सुरूवातीपासूनच सुरूवात करू. बॉम्बे म्हणजेच आपल्या देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची शान आत्ताची मुंबई. मुंबई इतिहासातील महत्त्व पूर्ण शहर कसं बनलं ते सांगत बसणार नाही. मात्र ते महत्वपूर्ण का होतं ते सांगतो. ब्रिटिश सरकारच्या काळात या शहराने बॉम्बे प्रेसीडेंसी (प्रशासकीय प्रांत) ची राजधानी म्हणून काम केले होते आणि 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस ते भारतीय राष्ट्रवादी आणि दक्षिण आशियाई प्रादेशिक – राजकीय चळवळींचे केंद्र होते. त्यानंतर, 1942 च्या अधिवेशनात, काँग्रेस पक्षाने “छोडो भारत” ठराव, मुंबई मध्येच मांडला आणि भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले.

Bollywood हे नाव पडलं Bombay पासून –

भारतीय चित्रपट सृष्टीची सुरूवात झाली ती मराठी माणसापासून म्हणजेच दादासाहेब फाळके यांच्यापासून त्यांनी दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा जरी मुक चित्रपट असला तरीही मराठी भाषेच्या विकासासाठी महत्व पूर्ण होता. कारण या चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार हे मराठी होते. तसेच हा चित्रपट मुंबईच्या कोरोनेशन सिनेमा हॉल‌ मध्ये एकोणीसशे तेराला प्रदर्शित झाला होता.

Hollywood पासून प्रेरणा घेत आणि Bombay पासून बनलं ते Bollywood. सर्वात जास्त चित्रपट तयार करत असल्यामुळे जगामध्ये Bollywood नेहमीच चर्चेत राहीले.
Bollywood तयार करत होते हिंदी सिनेमा आणि ते स्थित होते मराठी बहुभाषिक राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात. ही चंदेरी दुनिया पाहून देशातील मधील विविध राज्यांतील लोक आपसूकच मुंबई कडे आकर्षित झाले. सोबत मराठी इंडस्ट्री वाढत होती मात्र हिंदी सिनेमाच्या तुलनेत नेहमीच दुय्यम स्थान पदरी पडत राहीले.

मराठी सिनेमाचा प्रेक्षक वर्ग जास्त असूनही महाराष्ट्रात हिंदी सिनेमाला जास्त महत्त्व मिळत गेले. हिंदी सिनेमांत काम करणार्‍या लोकांना सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणून मराठी माणसं जरी मराठी बोलत होते मात्र ते हिंदी सिनेमा जास्त पाहू लागले. महाराष्ट्रातील बहुतेक शहरात आपोआपच हिंदी आणि मराठी दोन्हींचा वापर होऊ लागला. जसं English भाषेने हिंदी सोबत केलं तसं मराठी भाषेसोबत होऊ लागले.

Bollywood ची दुहेरी भूमिका –

बहुतांश Bollywood सिनेमे प्रदर्शित होताना तो तेलगु तमिळ कन्नड मल्याळम भाषेत होतात. मात्र ते मराठीत प्रदर्शित होत नाहीत. कारण त्यांनी मराठी माणसाला इतका हिंदीचा डोस दिला आहे की त्यांना वाटतं प्रत्येक मराठी माणसाला हिंदी भाषा समजली पाहिजे.

Source

Exit mobile version