chapadgaon-karjat : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चापडगाव रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे प्रशांत भोसले यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संचलन केले. गेल्या दोन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन होत आहे त्यामुळे गावकऱ्यांकडून अशा कार्यक्रमांचे स्वागत करण्यात येत आहे.
रक्तदान केल्यानंतर मंडळाच्या वतीने अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले होते. पुढच्या वर्षी गतवर्षी पेक्षा जास्त तरुणांनी सहभाग नोंदवावा व महापुरुषांच्या विचारांचा वारसा असाच पुढे चालू ठेवावा असे आवाहन करण्यात आले.
भव्य मिरवणूक – २५ एप्रिल रोजी महामानवाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली गेली. सर्व गावकरी तसेच आसपासच्या गावातील युवकांनी उपस्थिती दर्शवली.
व तरुणाईने महामानवाच्या गाण्यांवर ताल धरला. रात्री दहाच्या सुमारास मिरवणूकची सांगता झाली.