भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन पैकी एक असणारे anubhav singh bassi हे YouTube वरती ते खूप लोकप्रिय आहेत. तरुणाईला त्यांच्या विनोदांची भूरळ पडलेली असते. कोरोनाच्या काळातील त्यांचे Cheating आणि Hostel या विषयांवरील Skits फार Viral झाले होते. त्यानंतर त्यांनी केलेल्या All over India Shows ने दाणादाण उडविली.
सध्या ते चर्चेत आहेत Neelesh Misra यांना दिलेल्या Slow Interview मुळे. आयुष्यात मागे जाताना लहानपण कसं होतं. शालेय जीवनापासून ते घरची परिस्थिती कशी होती यांवर त्यांनी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.
कसं आईवडीलांनी आयुष्य घालवले मुलांचं शिक्षण करण्यासाठी हे सुद्धा त्यांनी सांगितले. anubhav singh bassi यांच्या वडिलांचे लॉ मध्ये शिक्षण पूर्ण केलं पण काही कारणांनी त्यांनी प्राक्टिस नाही केली.
ते शेती करत राहीले. आणि त्यांच्या आईंनी पशुपालन चालू केले, त्याच्याकडे ४/५ म्हशी होत्या. त्या दुग्ध व्यवसाय करायच्या. anubhav singh bassi यांनी जीवनातील प्रसंग सांगताना २००३ मध्ये कशा ३ म्हशी चोरीला गेल्या. यांच खूप छान वर्णन केले. तसेच आईच आणि पशूंचे संवेदनशील नातं उजागर केलं.