स्वतंत्र वीर सावरकर ट्रेलर –
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. रणदीप हुड्डा यांनी सावरकरांचा रोल केला आहे. स्वतंत्रता लढ्यात सहभागी असणारे आपल्या. देशभक्तीने संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या वीरांची ही कहाणी आहे. तसेच ट्रेलर मध्ये भगत सिंग, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरू मोहम्मद जिना, सुभाषचंद्र बोस, मदन लाल ढिंगरा, शामजी वर्मा आणि भिकेजी कामा, सुध्दा दिसतात.
मुंबईतील एका मल्टिप्लेक्स मध्ये हा ट्रेलर लाँच करण्यात आला.
दुष्प्रचार –
त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारला लिहलेले ते माफीनामे नसून जमानत याचीका होत्या. सावरकरांविषयी आजपर्यंत जे दुष्प्रचार करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं आहे ते या सिनेमाच्या माध्यमातून ते पुसण्याचा एक प्रयत्न आहे.
गांधी आणि सावरकर वाद –
गांधीजींच्या अहिंसा वादी धोरणाला सावरकर कडाडून विरोध करतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये असणारे मतभेद या ट्रेलर मधून स्पष्ट दिसतात. हा ट्रेलर येणार्या लोकसभा निवडणुकीला एक नवा आयाम देऊ शकतो.
कॉग्रेसवरती टिका –
शेवटी सावरकरांच्या तोंडून एक डायलॉग येतो – कॉग्रेसच्या कोणत्याही सदस्याला आतापर्यंत काळया पाण्याची सजा का नाही झाली ?
ट्रेलर मध्ये स्पष्ट रूपात कॉग्रेसवरती टिका केलेली आढळते.
उत्सुकता –
ट्रेलर ३ मिनिटे २१ सेकंदाचा असतानाही एकदम उत्सुकता वाढवणारा आहे.या चित्रपटासाठी दिलेलं बॅकग्राऊंड म्युझिक एकदम उत्सुकता वाढवणार आहे. जे हितेश मोडक आणि श्रेयस पुराणीक यांनी दिलं आहे. साऊथ इंडस्ट्री मध्ये काम करणारे अरविंद क्रिश्ना यात सिनेमॅटोग्राफरची भूमिका चोख बजावली आहे अस स्पष्ट दिसतं.
चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी दाद मिळवते.
महेश मांजरेकर आणि रणदीप हुड्डा यांचे मतभेद –
निर्देशक म्हणून रणदीप हुड्डाचा हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी महेश मांजरेकर हा सिनेमा निर्देशीत करणार होते. पण रणदीप हुड्डा आणि महेश मांजरेकर यांच्यात काही मतभेद झाल्याने त्यांनी हा सिनेमा सोडला.अंकिता लोखंडे, अमित सियाल हे कलाकार या चित्रपटात आहेत.
ट्रेलर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मेहनत –
रणदीप हुड्डाने केलेली मेहनत दिसते, काळया पाण्याची सजा सुनावली असताना त्यांच्यावर झालेला अमानुष अत्याचार दाखवला आहे.
अखंड भारत –
अखंड भारताचा मुद्दा सुध्दा अधोरेखित केला आहे.
हिंदू-मुस्लिम –
ट्रेलर मध्ये सावरकर १८५७ च्या उठावात, हिंदू आणि मुस्लिम कसे सोबत लढले होते याची आठवण काढतांना दिसतात.
प्रदर्शित –
मागच्या वर्षी या सिनेमाचा टिझर प्रदर्शित केला होता.
हा चित्रपट हिंदी सहित मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे
यापूर्वी हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता पण रणदीप हुड्डा यांचा निर्मात्यांशी त्याच्या हक्कांबाबत वाद झाला होता.
येत्या २२ मार्चला स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.