covishield side effects –
कोरोना विषाणूंच्या नायनाट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या covishield लसीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, हे अॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील स्पष्ट केले आहे.
आणि संपूर्ण जगभरात यांची चर्चा होऊ लागली. यातच भारतात अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून कोव्हिशिल्ड ही लस तयारी केली होती. भारतासह अनेक देशातील लोकांना ही लस दिली गेली होती.
कोणी केली होती सर्वात आधी तक्रार – ब्रिटनमधील जेमी स्काॅट नामक व्यक्तीने ही न्यायालयात याचिका दाखल केली होती. व या याचिकेवर उत्तर देताना कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो, अशी कबुली अॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली.
कंपनीचे आवाहन – नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन अॅस्ट्राझेनेकाने कंपनीकडून करण्यात आले आहे. तसेच covishield side effects हे क्वचितच आढळून येतील असे सुध्दा स्पष्ट करण्यात आले आहे.