...
Wed. Dec 18th, 2024
lok sabha 2024

निवडणूक आयोगाने शनिवारी, १६ मार्च २०२४ रोजी दुपारी 3 वाजता  2024 Lok Sabha निवडणुकीच्या  तारखा जाहीर केल्या आहेत.

देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

lok sabha 2024

कोणत्या राज्यात किती टप्प्यात होणार मतदान ?

अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगढ, दादरा नगर हवेली,गोवा , गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड आदी राज्यांत एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल. तर, छत्तीसगड, आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होईल. ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून. तसंच, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

 

आपल्या महाराष्ट्रात किती टप्प्यात होणार मतदान ?

महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होईल

maharashtra lok sabha 2024

२ कोटी नवे मतदार :

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ६ टक्क्यांनी नव्या मतदारांची भर  पडली आहे. तसेच यंदाच्या ९७ कोटी मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये. तसेच सुमारे २ कोटी नव मतदारांचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती नुकतीच निवडणूक आयोगानं जाहीर केली होती.

 

नियमित बैठका :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून विविध राज्यांमध्ये सध्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत. त्यांना काय अडचणी आहेत या जाणून घेतल्या जात आहेत.  यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स अर्थात इव्हीएम्स, सुरक्षा रक्षकांची गरज तसेच राज्यांच्या सीमांवर देखरेखीसाठीची तयारी यासांरख्या बाबींचा यामध्ये समावेश आहे.

 

इंडिया आघाडी साठी करो वा मरो ची स्तिथी  :

सलग दोन लोकसभा निवडणूका मध्ये दारुण पराभव झाल्यामुळे, २०२४ ची लोकसभा निवडणूक खूप महत्वपूर्ण आहे. आणि २०१९ च्या तुलनेत आजच चित्र खूप वेगळं आहे.

२०१९ च्या लोकसभा  निवडणुकीत भाजपने २०१४ च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. २०१४ मध्ये  २८२, तर २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३७.७% पेक्षा जास्त मते मिळाली होती, तर NDA ला ४५% मते मिळाली होती. आणि काँग्रेसला केवळ ५२ जागा जिंकता आल्या.

 

निवडणूक आयोगातील बदल  :

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असताना, अरुण गोयल यांनी शुक्रवारी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिला होता. व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी

शनिवारी त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी केली. त्यामुळे मुख्य निवडणूक आयोगात आयुक्त राजीव कुमार हे एकमात्र सदस्य उरले होते. एस. एस. संधू आणि ज्ञानेश कुमार यांची राष्ट्रपतीनीं निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

 

निकाल :

४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.